इतरमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

केईएम रूग्णालयातील प्रिन्सचा मृत्यू

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) –  मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या तीन महिन्यांच्या प्रिन्सचा मृत्यू झाला आहे. केईएम रूग्णालयातील हलगर्जीपणामुळे प्रिन्सला आपला हात गमवावा लागला होता. गुरूवारी त्याची तब्बेत आणखी खालवली होती. आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

केईएम रुग्णालात आगीच्या दुर्घटनेत प्रिन्सला हात गमावावा लागला होता. प्रिन्स राजभरची गुरूवारी तब्बेत खालावली होती. त्याच्या हालचालीही बंद झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

७ नोव्हेंबरला रुग्णालयात लागलेल्या आगीत प्रिन्सचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे त्याचा कान आणि हात कापण्यात आला.

शस्त्रक्रियेनंतर २ ते ३ दिवस प्रिन्सची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर प्रिन्सला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर त्याची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: