राज्य

जेएनयूतील विद्यार्थी देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांची लढाई लढताय – सुजात आंबेडकर

Spread the love

पुणे – जेएनयूतील विद्यार्थी देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांची लढाई लढताय. फी वाढी विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना मारहाण करून आवाज दडपणे हुकूमशाहीचे लक्षण आहे. सरकारच्या या कृत्याचा आम्ही सामूहिक निषेध करतो. असे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी केले.

यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले, दिल्ली पोलिसांनी जी विद्यार्थ्यांवर क्रूरपणे लाठीचार्ज केला आहे त्याचा मी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे नेहमी राहील. येथील शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, शेतमजुराच्या, शोषितांच्या, वंचितांच्या मुलांना शिक्षण स्वस्तात मिळावे म्हणून जीवनातील विद्यार्थ्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आंबेडकराईट स्टुड्ंटस् ऑर्गनायझेशनच्यावतीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांवर अमानुषपणे केल्या जाणाऱ्या लाठीचार्ज विरुद्ध आणि त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाचे आयोजन महाविद्यालयाच्या गेटवर करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे अनेक तरुण उपस्थित होते.

या आंदोलनात विद्यार्थ्यांनी JNU च्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रातील हे बीजेपी सरकार बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची दार बंद करू पाहत आहे. या सरकारला आधुनिक द्रोणाचार्य म्हटलं तर यात वावगे ठरणार नाही. जर बहुजन समाजातील विद्यार्थी शिकला तर तो उद्या आपल्यालाच प्रश्न विचारीन आणि त्याच्या हाताखाली आपल्याला काम करावे लागेल, याची या सरकारला भीती वाटते की काय असा प्रश्न माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना पडतो. या सरकारने हे आंदोलन पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही हे विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत त्याचबरोबर ते देशातील कामगारांच्या, शेतकर्यांच्या शोषितांच्या, वंचितांच्या, गटारी साफ करणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी लढताहेत. या विद्यार्थ्यांनी आमच्यासमोर एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. या विद्यार्थ्यांमुळे आज देशांमधील विद्यार्थी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या सरकारला प्रश्न विचारण्याचं काम करतायेत. यांनी खर्‍या अर्थाने आम्हाला शिकवलं विद्यार्थी पावर काय असते. आम्ही त्यांच्याकडून शिकलो म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आणि बीजेपी सरकार तसेच दिल्ली पोलीस यांच्या निषेधार्थ फर्ग्युसन महाविद्यालयात आंदोलनाची डरकाळी फोडली. ही डरकाळी JNU तील विद्यार्थ्यांना नक्कीच बळ देईल परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नक्कीच एकत्र करण्यासाठी उपयोगात येईल. असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: