इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

एम सी ई सोसायटीच्या विद्यार्थ्यांची लष्कराच्या आर्टीलरी ट्रेनिंग विभागाला भेट

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै- परवाज ‘या विशेष तुकडीच्या आठवी, नववीतील विद्यार्थ्यांनी नासिक येथे लष्कराच्या आर्टीलरी ट्रेनिंग विभाग(तोफखाना विभाग)ला 15 नोव्हेंबर रोजी भेट दिली.

सुभेदार मेजर गुरुदेव सिंग , प्रशिक्षण विभागाचे अधिकारी आर बी पांडे, दलबीर सिंग यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आर्टीलरी संग्रहालय, शस्त्रास्त्रांची माहिती दिली. येथील परेड ग्राउंड वर या विद्यार्थ्यांच्या तुकडीने लष्कराला मानवंदना दिली.

पै परवाझ तुकडीच्या संचालक मुमताज सय्यद , राजेंद्र पवार, फहीम अरसक, आरिफ सय्यद, शबाना सय्यद उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: