इतरमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

विषारी इंजेक्शन घेऊन केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) –  केईएम रुग्णालयात एका डॉक्टरने आत्महत्या केली आहे. प्रणय जयस्वाल (२८) असे या डॉक्टरचे नाव आहे. प्रणय केईएम रुग्णालयात ज्यूनिअर रेसिडंट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येमुळे केईएम रुग्णालयात अनेकांना धक्का बसला आहे.

प्रणय जयस्वाल यांनी आत्महत्येचे इतके टोकाचे पाऊल का उचलले ? ते अजून स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना औषधांची व्यवस्थित माहिती होती. विषारी इंजेक्शन घेऊन प्रणय यांनी स्वत:ला संपवले.

पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येसंदर्भात कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही. प्रणय जयस्वाल मुंबईत नोकरी करत असले तरी ते मूळचे अमरावतीचे आहेत. पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली असून तपास सुरु आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: