इतरऔरंगाबादमराठवाडाराज्यसंपादकीय

विश्वशांती धर्म सोहळ्याचे वेरुळात ध्वजारोहण उत्साहात

संस्कारक्षम तरुणपिढी घडवण्यासाठी जपानुष्ठान आवश्यक - प.पु. स्वामी शांतिगिरीजी महाराज

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(औरंगाबाद ) – निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी ऋषी-मुनींसाठी असलेली जपानुष्ठान परंपरा जनसामान्यांच्या उद्धारासाठी सुरू केली.

ही परंपरा समाजासाठी वरदानकारी असून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आपल्या घरातील तरुणांना जपानुष्ठान परंपरेत सहभागी करा असे प्रतिपादन अध्यात्म शिरोमणी परम पुज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ श्रीक्षेत्र वेरुळ येथे १ ते ९ डिसेंबर दरम्यान ‘विश्‍वशांती” धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात महाजपानुष्ठान,अखंड नंदादीप,महिला जप,श्री शिवदत्त सद्गुरू पंचायतन महायज्ञ,हस्त लिखित नामजप,नामसंकीर्तन अर्थात “ओम जनार्दनाय नमः” या महामंत्राचा गजर,श्रमदान यांसह रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी,प्राणायाम,ध्यान,भागवत वाचन, महाआरती, भजन, प्रवचन, सत्संग, विविध स्पर्धा यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे ध्वजारोहण विविध क्षेत्रातील मान्यवर,आश्रमीय संत,भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.यावेळी “ओम जनार्दनाय नमः” या महामंत्राच्या प्रचंड जयघोषत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहण सोहळ्याचा प्रारंभ पहाटच्या नित्यनियम विधी,ध्यान,प्राणायाम,भागवत वाचन ,महाआरती, यानंतर जगदगुरु बाबाजींच्या सवाद्य पालखी मिरवणुकीने करण्यात आला.यानंतर ध्वजारोहण सोहळ्याच्या मुख्यकार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे , आमदार दिलीपराव बनकर,आमदार अंबादास दानवे, आमदार हिरामण खोसकर ,आमदार प्रशांत बंब, आमदार सरोजताई आहेर , आमदार नरहरी झीरवाळ ,आमदार रमेश बोरणारे, सायलीताई भानुशाली,उपमहापौर विजयभाऊ औताडे , सुप्रसिद्ध गायक राजेश सरकटे , संजय सरकटे , विवेक जैस्वाल , यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी टाळ मृदुंगाच्या गजरात जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक लक्षवेधी ठरली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना अध्यात्म शिरोमणी परम पुज्य स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी धर्मउपदेश केला.महाराजांनी यावेळी सदगुरु महिमा भागवत वाचल्याशिवाय कळणार नाही असे सांगतानाच भागवत पहा…भागवत वाचा…असे तीनदा सांगून भाविकांना भागवत अवश्य वाचा असा संदेश दिला.

आजची तरुण पिढी संस्कारक्षम होणे गरजेचे असून मुलांना शालेय शिक्षणा बरोबरच बालवयातच संस्काराची गरज आहे.आई-वडील आणि शिक्षकांची ही महत्वाची जबाबदारी आहे. इंजिनियर चुकला तर फक्त बिल्डिंग कोसळेल.

मात्र शिक्षक चुकला तर पिढ्यानपिढ्या उध्वस्त होऊ शकतात.मुलांच्या संगत आणि पंगत याकडे आवरजून लक्ष द्यावे असे सांगितले. यावेळी परमपूज्य बाबाजींच्या दर्शनासाठी भविकांनी मोठी गर्दी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: