इतरमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

रेल्वे स्टेशनवर तरुणीला न्यूड फोटो दाखवले, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अटक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – तरुणीला न्यूड फोटो दाखवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना रविवारी अटक केली. संजय कुमार गुप्ता (४२) आणि सचिन कदम (३५) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. संजय कल्याण तर सचिन अंधेरी येथे राहतो. नेहरु नगर पोलिसांनी ही माहिती दिली. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

तक्रारदार तरुणी नवी मुंबईत राहयला असून ती सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत आहे. व्यवसाय विस्तारासंदर्भात मैत्रिणीने तिला संजय गुप्ताची भेट घ्यायला सांगितली होती. संजय गुप्ताने तरुणीला शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्यांना सचिन कदम भेटला.

गुप्ता आणि कदमने तक्रारदार तरुणीला न्यूड फोटो दाखवले. तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला व तिला एका न्यूडिटी संदर्भातील कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले. तरुणीने तिच्या पालकांना कुर्ला रेल्वे स्थानकावर बोलवून घेतले.

त्यांनी दोन्ही आरोपींना मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. गुप्ता आणि कदम यांच्याविरोधात कलम ५०९ आणि ३५४ अ (लैंगिक छळ) या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नेहरु नगर पोलिसांनी ही माहिती दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: