इतरगुन्हेविश्वमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार, नालासोपाऱ्यातील घटना

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – मॉर्निग वॉकला गेलेल्या एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. आरोपींनी तरुणीला बंधक ठेवत तिच्यावर १२ तास सामूहिक बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.

नालासोपारा पूर्व येथील गालानगर येथे राहणारी १७ वर्षीय तरुणी शनिवारी पहाटे ५.३० च्या सुमारास आपल्या मित्रांसह नागेला तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी चार तरुण तिथे आले जबरदस्तीने तरुणीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पीडित मुलीसोबत असलेल्या मित्रांनी विरोध केला. मात्र आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत धमकावले आणि तरुणीला जबरदस्तीने रिक्षात बसवून नेले.

या आरोपींनी पीडित मुलीला वैतीवाड़ी परीसरातील बांधकाम सुरू असलेल्या मोहम्मदी बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर नेऊन डांबून ठेवले. यावेळी चौघा आरोपींनी १२ तास तिच्यावर आळी-पाळीने सामूहिक बलात्कार केला. संध्याकाळी पाच वाजण्याच्या तरुणीने आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि थेट तुळींज पोलीस स्टेशन गाठत घडल्या प्रकाराची माहिती दिली.

तुळींज पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अमित बाटला, रोहित उर्फ मेंटल, कैलाश आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीवर अपहरण, सामूहिक बलात्कार तसेच बाल- लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) अंतगर्त गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी रोहित, कैलाश आणि एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली. तर मुख्य आरोपी अमित बाटला घटनास्थळावरून फरार झाला होता. या फरार आरोपीच्या आम्ही मागावर असून लवकरच त्याला पकडण्यात येईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: