इतरमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

‘कमाल’च झाली! कारचा चक्काचूर करत अभिनेत्याचा मुलगा मागतोय नवीन गाडी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेला स्वयंघोषित चित्रपट समिक्षक व अभिनेता कमाल खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. परंतु यावेळी केआरके कुठल्याही वादग्रस्त विधानामुळे नव्हे तर त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. त्याच्या मुलाने गाडीचा अपघात केला व आता तो नवीन गाडी मागत आहे.

कमालचा मुलगा फैसल ऑफिसला जात असताना त्याने कुठल्याशा गाडीला ठोकर मारली. अशी माहिती स्वत: कमाल खान याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन दिली.

त्याने यासंदर्भात माहिती देत अपघात झालेली कार दाखवली. अपघातामध्ये कारचे बरेच नुकसान झालेले स्पष्टपणे दिसते. या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

“फैजल ऑफिसला जात होता आणि त्याने गाडीचा अपघात केला. गाडीचा अगदी उत्तम प्रकारे त्याने अपघात केला आहे. पण ठिक आहे हरकत नाही.” अशा शब्दात कमालने त्याच्या मुलाने केलेल्या प्रतापाची माहिती दिली.

यानंतर कमालने आणखी एक ट्विट केले. यात त्याने असे लिहिले की “अपघातामुळे फैसलला आता बीएमडब्ल्यू कार चालवायची इच्छा उरली नाही. आता तो ऑडी R 8 किंवा रेंज रोव्हरची मागणी करत आहे.”

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: