इतरदेशरणधुमाळी

शिवसेना काँग्रेसप्रणित यूपीएसोबत जाणार नाही : संजय राऊत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्वतंत्र अस्तित्व पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेचे खासदार शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतूनही आज त्यांची भाजपाविरुद्ध बॅटींग सुरूच आहे.

शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे. शिवसेनेचे लोकसभेत 18 सदस्य तर राज्यसभेत 3 सदस्य आहेत. लोकसभेत एनडीएचे 380 सदस्य आहेत. त्यापैकी शिवसेनेचे 18 सदस्य कमी झाल्याने एनडीएची सदस्यसंख्या 362 झालेली आहे.

शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असली तरी, अजून काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही. तर, शिवसेना युपीएमध्ये सामिल होणार नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शेरो-शायरीद्वारे भाजपावर टीकास्त्र सोडले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: