इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

पुण्याचे नवे महापौर मुरलीधर मोहोळ

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – पुण्याचे नवे महापौर म्हणून नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित झाले आहे. तर, उपमहापौरपदाची माळ अद्याप कोणाच्या गळ्यात पडलेली नाही.

महापौरपद खुलया गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित आहे. या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षानेच हुलकावणी दिल्याने अनेकजणांनी फिल्डिंग लावली होती.

मात्र, राज्यातील सत्तेच्या नव्या समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर अभ्यासू आणि अनुभवी नगसेवकाला या पदावर संधी मिळेल, असे. पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते. त्यानुसार मोहोळ यांना ही संधी दिली आहे.

या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमावारी अर्ज भरण्यात येणार आहेत. महापालिकेत भाजपकडे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदासह सर्व पदाधिकारी भाजपचेच आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: