इतरमुंबईमुंबईराज्यसंपादकीयसाहित्य

बाळासाहेब परत या… घोषणांनी दुमदुमले शिवतीर्थ

Spread the love

 महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई ) – बाळासाहेब ठाकरे अमर रहे, साहेब तुम्ही परत या, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढो अशा घोषणा देत ठाण्यातील हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. सायंकाळी शिवसैनिकांनी रेल्वेने प्रवास करून शिवतीर्थ गाठले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरासह देशभरातून शिवसैनिक मुंबईतील शिवतीर्थवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना नतमस्तक होत होता. अनेक मान्यवर यावेळी येथे रांगेत उभे राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेत होते.

सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागली होती. ठाणे जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थवर गेले. ठाणे येथून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले. रविवारी सायंकाळी ४.००च्या सुमारास ठाणेतील विविध भागातून शिवसैनिक ठाणे रेल्वे स्थानकावर जमा झाले होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवसैनिकांमुळे संपूर्ण ठाणे परिसर भगवामय झाला होता. तसेच घोषणांनी दुमदुमून निघाला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, पक्षाचे नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: