इतरमुंबईमुंबईराज्यसाहित्य

बाळासाहेब ठाकरेंचा 7 वा स्मृतीदिन : राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतिर्थावर

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई ) – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 7 वा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर गर्दी करतात. यावर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे. यावेळी ठाकरे कुटुंबातील पहिला ठाकरे निवडणूक मैदानात उतरुन विधानसभेत पोहचला आहे.

दुसरीकडे शिवसेनेने भाजपसोबतच्या मागील 30 वर्षांपासूनच्या युतीचा मार्ग सोडत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर दर्शनासाठी येतात. यावर्षीच्या स्मृतीदिनाला काहीशी वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे.

कारण, पहिल्यांद्याच ठाकरे कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेऊन आघाडीशी घरोबा केला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनीच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, तसं काही झालेलं दिसत नाही.

सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय कधी होणार हे पाहावे लागणार आहे. शिवसेनेशी सूर जुळविलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते यानिमित्त शिवतीर्थावर जातील अशी दाट शक्यता आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: