इतरगुन्हेविश्वराज्यवर्धाविदर्भ

बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Spread the love

दशरथ ढोकपांडे, (हिंगणघाट-वर्धा) – मागील कित्येक दिवसांपासून शहरातील आठवडी बाजारात साप्ताहिक बाजार भरल्या जात असतो. या बाजारात भाजीपाला इतर वस्तू खरेदी करण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकांचे मोबाईल चोरीला जात आहे. या घटनेकडे लक्ष देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी बहुजन क्रांती मोर्चा चे वतीने पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात आले आहे.

अनेक दिवसापासून मोबाईल चोरट्यांनी या आठवडी बाजारात भाजीपाला व इतर वस्तू खरेदी करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरी केल्या जाते, याप्रकरणी ठाण्यात अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, या घटनेमुळे नागरिक त्रस्त झालेले आहे ,मोबाईल चोरी होण्याच्या घटना थांबविण्यात करिता पोलिसांनी एक विशेष पथक नेमून मोबाईल चोरांना अटक करण्यात यावी ,अशा मागणीचे निवेदन या संघटनेच्या वतीने देण्यात आले, निवेदन देतेवेळी बहुजन क्रांती मोर्चा चे गजानन वराडे बहुजन मुक्ती पक्षाचे गजानन माऊस कर इंडियन लायर्स असोसिएशनचे एस ,टी कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा चे सूरज डोंगरे लक्ष्मीकांत जावडे सुरेश दिवे आदीसह संघटनेचे पदाधिकारी निवेदन देतानी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: