इतरकोकणराज्यसंपादकीय

मासे खाणं महागलं; मच्छीमारही मेटाकुटीला

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) –  कोकण किनारपट्टीवर सध्‍या मत्‍स्‍यदुष्‍‍काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बदलत्‍या हवामानाबरोबरच एलईडी, पर्सनेट मासेमारी आणि प्रदूषणामुळे खवय्यांना हवेहवेसे वाटणारे मासे मिळेनासे झाले आहेत. त्‍यामुळे खवय्यांच्‍या खिशाला चाट बसतेय.

तसेच मासेच मिळत नसल्याने माशांचे दर गगनाला भिडले आहेत. बोटीला मासेच मिळत नसल्याने खर्च भागवायचा कसा अशा प्रश्न मच्छिमारांना पडलाय

सध्या माशांचे दर काय आहेत?

माशाचा प्रकार
आधीचे दर आताचे दर
पापलेट ७०० रुपये किलो १३०० रुपये किलो
सुरमई ४०० रुपये किलो ८०० रुपये किलो
कोळंबी २०० रुपये किलो ३५० रुपये किलो
बांगडा ७० रुपये किलो २०० रुपये किलो
सौदाळा ९० रुपये किलो ३५० रुपये किलो

एकूणच माशांच्या दुष्‍काळामुळे पारंपारीक मच्‍छीमार मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे जीभेचे चोचले कसे पुरवायचे असा प्रश्‍न आता खवय्यांना पडलाय.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: