इतरकृषीराज्यवर्धाविदर्भ

माजी आमदार राजू तिमांडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा

Spread the love

दशरथ ढोकपांडे,(महाराष्ट्र विश्व न्यूज,वर्धा) – 1)परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघता सरसकट हेक्टरी रु ५०,०००/- हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत.
2) राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याबाबत.
3)आर एस आर मोठा मिल्स हिंगणघाट येथील कामगारांना काम मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे त्या अनुषंगाने मा मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करून न्याय द्यावा.
4) मोहता मिल हिंगणघाट येथील कपडा खाता बंद करून कामगारांना व्ही.आर.एस न दिल्याबाबत.

परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघता सरसकट हेक्टरी रु ५०,०००/- हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांना पिकांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरिता विदर्भ दौऱ्यावर आले असताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सांगून निवेदन दिले.

मागील 10 दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन कापूस ज्वारी मूग इत्यादी शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके नुसतेनाभूत झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची सरकारने सरसकट हेक्टरी रु 50000/- हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.

25 जुलैपासून सतत पडणाऱ्या पावसाने 2 महिने 10 दिवसाच्या कालावधी घेऊन शेतकऱ्यांचे दैनावस्था झाली सतत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके कशीबशी जिवंत होती त्यात पावसाने उसंग दिल्यामुळे शेतकऱ्याने ऑक्टोंबर महिन्यात शेतीची मशागत करुन पिकांमध्ये जिवंतपणा आणला.

सोयाबीनचे पीक हातात येत असताना अचानक परतीच्या अवकाळी पावसाने हजारो हेक्टरमधील पिके उध्वस्त केली या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या जेमतेम सोयाबीनच्या पिकांची घासही हिरावून नेला अचानक पणे जोरात पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या संगणी करताना शेतात ठिकाणी लावलेल्या सोयाबीनच्या लहान-लहान गंजयाही उचलता आला नाही.

त्यामुळे त्या सर्व गंज्या भिजल्या त्यामुळे सोयाबीनच्या शेंगातील दाण्याला अंकुर फुटले त्याच्या सततच्या पावसामुळे शेतात पडलेल्या बंजारा पाण्यात भिजल्यामुळे सोयाबीनच्या दाना काळपट येऊन सडला व त्यामुळे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.

कपाशीचे पीक बोंडे माती फुले घेऊन उंबरठ्यावर असताना पडलेल्या अवकाळी पावसाने बुरशीच्या रोगांमुळे गळून पडली आहे जोराचा पाऊस आणि हवा यामुळे कपाशी चे पिके जमिनीवर पडले असून बोंडे सडली आहे वातावरणात पडलेल्या धुयारी मुळे कपाशीच्या पिकांवर पात्या गळून पडल्या आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे या पावसामुळे ज्वारी भाजीपाला उत्पादक शेतकरी होरपळून निघाला आहे.

तरी शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे न करता सरसकट रु 50000 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना देऊन दिलासा द्यावा अशी विनंती माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली त्यावेळी हिंगणगाव तालुका रा.काँ.पा चे अध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष भूषण भिसे राजेश शेंडे, बंडू डेकाटे, पुरुषोत्तम गव्हाणे, निखिल वदमवार ,सुनील मून,अशोक डगवार ,मधुकर कामडी, प्रदीप डगवार, ज्ञानेश्वरराव ठावरे इत्यादी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: