अहमदनगरइतरउत्तर महाराष्ट्रगुन्हेविश्वप्रशासनराज्यसंपादकीय

न झालेलेे गार्डनही बीओटीवर…

गणेश भोसले यांनी केला पर्दाफाश

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(अहमदनगर ) – गार्डनची उभारणी करून वर्षभर त्याची देखभाल करण्याची अट असताना अन् ते गार्डनच पूर्ण नसतानाही बीओटी तत्वावर देण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केल्याचा प्रकार नगरसेवक गणेश भोसले यांनी उघडकीस आणला. या प्रतापाची चर्चा स्थायी समितीत सुरू असून त्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहे.

सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज स्थायी समितीची सभा सुरू झाली. या सभेत सावेडीतील महालक्ष्मी उद्यान आणि सिध्दीबाग बीओटीवर देण्याचा विषय होता. सुरू झालेल्या या चर्चेत गणेश भोसले यांनी महापालिका प्रशासनातील धक्कादायक प्रताप मांडला.

अमृत योजनेतून नगर शहरात 26 उद्याने प्रस्तावित आहेत. त्याचे काम सुरू आहे. हे काम करणारे ठेकेदार उद्यान पूर्ण झाल्यानंतर वर्षभर त्याची देखभाल, दुरूस्ती करणार आहे. असे असतानाही ते उद्यान बीओटीवर देण्याचे प्रयोजन काय? असा सवाल करत भोसले यांनी हा प्रताप उघडकीस आणला.

याशिवाय गंगा उद्यानाच्या ठेकेदाराची मुदत संपून अडीच वर्षे झाली तरी त्यावर कोणतीच कार्यवाही प्रशासनाने केली नाही. ठेकेदार कोण?, किती पैसे घेतले जातात असे प्रश्न करत भोसले यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले.

17 हजार झाडे आहेत कोठे ?

महापालिकेने नगर शहरात 17 हजार झाडे नव्याने लावल्याचे समितीच्या बैठकीत सांगण्यात आले. मात्र ही झाडे नेमके कोठे लावली याची माहिती द्या असे भोसले यांनी प्रशासनाला सुनावले. कोणत्या प्रभागात किती अन् कोठे झाडे लावली याची यादी भोसले यांनी महापालिका प्रशासनाकडून मागितली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: