शेतकर्यांच्या मदतीसाठी शासनाकडे मागणी
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने निवेदन

खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
विनोद नंदागवळी,(महाराष्ट्र विश्व न्यूज,वाशिम ) –अवकाळी पावसाने संपुर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले.
त्याच अनुषंघाने शेतकऱ्यांच्या प्रश्नासहीत विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (BRSP) चे संस्थापक-अध्यक्ष अँड.डाँ.सुरेश माने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी आज दि.11-11-2019 रोजी महाराष्ट्रभर आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
त्याच आदेशानुसार या प्रश्नाबाबतचे निवेदन कारंजा (लाड) येथे दुपारी 2 वाजता देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पक्षाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50,000 नुकसान भरपाई देण्यात यावी, पिकवीमा योजने अतंर्गत विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांचे फसवणुक करतात अशा कंपन्यावर कारवाई करणे, राज्यातील प्रत्येक नागरिकास आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच झाले पाहीजे .
यासाठी अर्थसंक्लपात तरतुद करावी, के.जी. टू पि.जि. मोफत शिक्षण द्यावे व उच्चशिक्षणासाठी शुन्य टक्के व्याज दराने कर्ज द्यावे, उद्योगधंद्यात 80 टक्के नौकऱ्या भुमिपुत्राना देण्यासाठी नव्या सरकारने त्वरीत कायदा करावा, राज्यात प्रत्येक कामगारास किमान वेतन 21,000 झाले पाहीजे व जुनी पेंशन योजना पुन्हा सुरू करावी, आरक्षण कक्षेतिल घटकांच्या आरक्षण अंमलबजावणी झाली पाहीजे व प्रत्येक घरात पात्रतेनुसार किमान एक सरकारी नौकरी भेटली पाहीजे, महाराष्ट्रातिल ओबिसीची जनगणना झालीच पाहीजे.
त्यासाठी स्वातंत्र्य मंत्रालय स्थापन करावे, भटके-विमुक्त समाजाला क्रिमीलेअरची अट नष्ट करावी त्यांना एस.सि.एस.टी.अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे रक्षण बहाल करणे व भटक्या-विमुक्ताच्या तांड्याना गावाचा दर्जा मिळाला पाहीजे ह्या मागण्या केल्या आहेत.
अशा प्रकारच्या दहा मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सादर केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गुळदे, युवा नेते सचिन खांडेकर, अमोल अंभोरे, वैभव इंगळे, बंटी बोरकर, हे उपस्थित होते.
खरेदी करताय? तत्पूर्वी खालील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!
खरेदी करताय? तत्पूर्वी वरील ‘Search Box’ मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!