आरोग्यइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईराज्यलाईफस्टाईलविदर्भसामाजिकसिटीजन जर्नालिजम

डिहायड्रेशन – कारणे व उपाय

Spread the love

पंकज रामदास खुसपे – (प्राध्यापक, नवसह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
डिहायड्रेशन

डिहायड्रेशन म्हणजेच माणसाच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे होय. जर शरीरात योग्य प्रमाणात पाण्याची पातळी नसल्यास त्याचा परिणाम माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरणसारख्या विविध प्रणाली तसेच त्या प्रणालीच्या कार्यपद्धतींवर होतो. तहान लागेल तेव्हाच पाणी पिण्याच्या सवयींमूळे पेशींमध्ये पाण्याची कमतरता होते. आणि त्याचा मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड, पोट याच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
डिहायड्रेशनची कारणे
डिहायड्रेशनचे प्रमुख कारण घामच्या रुपात शरीरातून पाण्याची पातळी अति प्रमाणात कमी होणे होय. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे, पाण्याचे कमी प्रमाणात पिणे, उन्हात खेळणे, इत्यादी डिहायड्रेशनची प्रमुख कारणे आहेत.
डिहायड्रेशनची लक्षणे
घशाला कोरड पडणे
सतत तहान लागणे
डोकं किंवा अंग दुखणे
लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे
त्वचा कोरडी पडणे
मलावरोध होणे
डोकेदुखी
चक्कर येणे
अशक्तपणा
मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे
हृदयाचे ठोके वाढणे
रक्तदाब कमी होणे
वजन झपाट्याने कमी होणे
१.ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकतं.
२.उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.
३.डिहायड्रेशनमूळे शरीरातील मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाईट्स, सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड यांच्या पातळीमध्ये असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
डिहायड्रेशनपासुन वाचण्याचे उपाय
१.उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात न फिरणे.
२.पाणी जास्त प्रमाणात पिणे.
३.उन्हात बाहेर फिरणे टाळावे.
४.उन्हात जाताना डोक्यावर काही तरी घेऊन जाणे.
डिहायड्रेशनवर घरगुती उपाय
१.डिहायड्रेशनवर मुख्य उपाय म्हणजे सतत पाणी प्यावे. सर्वसाधारपणे ८ ते १० ग्लास पाणी
प्यायलाच हवे.
२.उन्हाळ्यात नियमित पाणी, फळं, फळांचा रस प्यायला पाहिजे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते.
३.उन्हाळ्यामध्ये दिवसातून १ ते २ वेळा शहाळ्याचे पाणी किंवा लिंबू पाणी प्यावे.
४.एक ग्लास पाण्यामध्ये साखर, चिमूटभर मीठ आणि ओआरएस टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन कमी होते.
५.कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, आवळा, स्ट्रॉबेरी, काकडी, कांदा, टोमॅटो, पालक, मुळा, गाजर या
६.फळभाज्यांचा आहारात समावेश करावा.
७.आपल्या दैनंदिन आहारात दही किंवा ताकाचा समावेश करावा.

Tags

Related Articles

12 Comments

Leave a Reply

Close
%d bloggers like this: