इतरबुलढाणाराज्यविदर्भसंपादकीय

प्राथमिक शिक्षण ज़िल्हा परिषेदेत झालेल्या डॉ मधुरा ताठे (बडे ) पदवीत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये देशातून प्रथम

Spread the love

गजानन कायंदे ,(महाराष्ट्र विश्व न्यूज,देऊळगाव मही – बुलढाणा) – आज कालची शिक्षण प्रणाली व त्यामधून होणारे पालकांमध्ये संभ्रम याला फाटा देत देऊळगाव मही येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. जे. पी. ताठे यांची कन्या मधुरा ताठे (बडे ) हिने देशातून पदवीत्तर शिक्षणामध्ये रेडियो डायग्नोसिस या विषयामध्ये देशातून पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे.

त्याचे १ ली ते ४ वर्गापर्यंत शिक्षण देऊळगाव मही येथील जिल्हा परिषद मध्ये झाले असून ५ वि ते १० वि पर्यंतचे शिक्षण देऊळगाव राजा येथील कस्तुरबा शाळेमध्ये झाले व पुढील एम. बी. बी. एस. चे शिक्षण विखे पाटील वैद्यकीय शिक्षण अहमदनगर येथून त्यांनी पूर्ण केले. त्यांनी जिद्द मेहनत चिकाटी या जोरावर हे अभूतपूर्व यश त्यांनी संपादित केल आहे.

देऊळगाव महि येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ .जे. पी. ताठे हे त्यांचे वडील लहान पनापासूनच त्यानी मधुरा ला योग्य मार्गर्दर्शन केले. या सर्व यशासाठी त्यांनी त्यांचे वडील डॉ .जे. पी. ताठे आई सुहास ताठे पती सासरे यांचे आभार मानले.

बुलढाणा जिह्यात ग्रामीण भागात शिकून मधुरा ताठे(बडे ) यांनी घवघवित यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कोतुक होत आहे. डॉ . मधुरा ताठे यांनी पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्त्याना सल्ला दिला की जिद्द व मेहनतीच्या जोरावर आपण यशाची शिखरे नक्की गाठू शकतो फक्त आत्मविश्वास ठेवा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: