इतरसंपादकीय

जाणून घ्या, जमावबंदी म्हणजे काय?

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – कलम 144 हे फौजदारी दंडसंहिता 1973 मधील आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि जेथे सुरक्षेला बाधा पोहचू शकते वा दंगलीची शक्यता असेल. त्यावेळी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतात.

यामध्ये 5 किंवा जास्त लोकांनी एकत्र येण्यास निर्बंध आणले जातात. यालाच जमावबंदी अथवा कर्फ्यू असं म्हणतात.तसेच अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या व्यक्तीवर, लोकांवर व त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांवर सुद्धा बजावली जाऊ शकते.

या आदेशाचा कालावधी हा 2 महिन्यापेक्षा जास्त असता काम नये, कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा जमावबंदी लागू केली जाऊ शकते.परंतु जर राज्य सरकारला वाटले तर नागरिकांच्या जीविताला धोका व आरोग्याला धोका असेल व दंगलीची संभावना असेल तर ती 6 महिण्यापर्यंत सुद्धा लागू काली जाऊ शकते.

जमावबंदी कोण लागू करू शकतात?:-

जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी आणि इतर कार्यकारी दंडाधिकारी देऊ शकतात व लागू करू शकतात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: