इतरराज्यविज्ञान तंत्रज्ञानसंपादकीय

मोबाईल व इन्टरनेटचे व्यसन घातक पातळीवर” – डॉ. संज्योत देशपांडे

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – समाजातील अनेक स्तरांमध्ये मोबाईल फोन व इंटरनेटचे व्यसन घातक पातळीवर पोचले आहे. आयुष्याच्या गुणवत्तेवर याचा अनिष्ट परिणाम होत असून लहानथोर सर्वांमध्येच ताणतणावर, नैराश्य, अस्वस्थतेचे प्रमाण वाढीस लागले आहे.

या व्यसनामुळे नागरिक शारीरिक व मानसिक व्याधींनी ग्रस्त होत असून या उपकरणांची उपयुक्तता व अतीवापर यातील फरक सजगपणे समजून घेण्याची वेळ आलेली आहे” असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ. संज्योत देशपांडे यांनी केले.

करम व रंगतसंगत प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, “गेम्स, चॅटिंग, पोर्नोग्राफी अशा विविध व्यसनांमुळे किशोरवयीन मुले दुराग्रही होत आहेत तर वैवाहिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होत आहेत.

तसेच, एकाकीपणावर मोबाईल किंवा इंटरनेट हा एकमेव उपाय नाही. आपल्या आयुष्यातील वेळाचा संतुलित व गुणवत्तायुक्त वापर करणे व अतिरेकी वापराबाबत सजग राहणे हे अपरिहार्य झालेले आहे.

या प्रसंगी करम प्रतिष्ठानचे भूषण कटककर, रंगतसंगत प्रतिष्ठानचे अ‍ॅड प्रमोद आडकर व मैथिली आडकर उपस्थित होते. व्यसन मोबाईलचे या विषयावर डॉ. देशपांडे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. प्रज्ञा महाजन यांनी मोबाईलचे जाळे या विषयावरील सांख्यिकी अहवाल सादर केला.

यानंतर झालेल्या निमंत्रितांच्या कवीसंमेलनात मृणालिनी कानिटकर, वर्षा कुलकर्णी, प्रमोद खराडे, स्वाती सामक, स्वाती यादव, वासंती वैद्य, कविता क्षीरसागर, चंचल काळे, सुनीति लिमये, मिलिंद छत्रे, आरती देवगांवकर आदी उपस्थित होते. मृणालिनी कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: