इतरमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

अयोध्या: शदर पवार यांच्याकडून निकालाचे स्वागत

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी स्वागत केले आहे. या निकालाचा सर्व वर्गातील लोकांनी आदर बाळगावा आणि देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असे पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ज्यांना जनादेश मिळाला आहे, त्यांनी लवकरच सरकार स्थापन करावे. आम्ही विरोधी बाकावर बसून काम करत राहू या आपल्या भूमिकेचा पवार यांनी पुनरुच्चार केला. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी ही भूमिका पु्न्हा एकदा मांडली.

काँग्रेस आणि आम्ही निवडणुका एकत्र लढलो असल्याने काँग्रेसचे नेते आमच्याशी येऊन चर्चा करतात, असेही पवार एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले.

‘सर्व समाजाच्या हिताचे रक्षण करण्याबाबतची न्यायालयाची भूमिका’

दरम्यान, अयोध्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने समाजाच्या सर्व वर्गांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने विचार केला ही खूपच चांगली गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. अयोध्या प्रकरणी हा ऐतिहासिक निर्णय आला असून या निर्णयाचा सर्व वर्गातील लोकांनी सन्मान करायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले.

सु्प्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर लगेचच लोक वादग्रस्त जागी जाऊन पूजा करू लागले आहेत, या वर प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले की, कुणाला मंदिरात जायचे असेल त्यांनी जावे, कुणाला मशिदीत जायचे असेल त्यांनी जावे, तो त्यांचा अधिकार आहे. देशात शांततेसाठी समाजात बंधुभाव वाढण्यास मदत केली पाहिजे. असे पवार म्हणाले. हा विषय राजकारणापलिकडचा असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आल्याबाबतही पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर, हा देशासाठी निर्णय आहे, केवळ राज्यासाठी हा निर्णय नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: