अध्यात्मिकइतरदेशप्रशासनमुंबईमुंबईराज्यसंपादकीय

अयोध्या वादावर आता पडदा पडलाय: नवाब मलिक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून या निकालानंतर अयोध्या वादावर पडदा पडला आहे,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडली आहे.

अयोध्येत राम मंदिरच; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी निकालानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. मग राजकीय पक्ष असो किंवा धार्मिक संघटना, सर्वांनीच तो मान्य केला पाहिजे, अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती,’ असं मलिक म्हणाले.

‘कुठेही उत्सव साजरा केला जाऊ नये. कुणाच्या भावना दुखावल्या जावू नयेत’, असं आवाहनही मलिक यांनी केलं आहे. ‘यापुढं कुठल्याही राजकीय पक्षांच्या माध्यमातून धर्माच्या नावानं पुन्हा वाद होणार नाही, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.

वाचा: अयोध्या निकालाला आव्हान देणार: जिलानी

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला असून अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तसंच, येत्या तीन महिन्यांत ट्रस्ट स्थापन करून तिथं मंदिर उभारण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निकालामुळे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालावर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केलं जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: