अध्यात्मिकइतरदेशप्रशासन

अयोध्येत राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा

सुप्रीम कोर्ट न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – वादग्रस्त जागा रामजन्मभूमी न्यासाला देण्यात यावी. ट्रस्ट बनवून मंदिर बांधा. मंदिर निर्माणासाठी नियम बनवावेत.:- सुप्रीम कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा द्या. तीन महिन्यात केंद्राने जागा द्यावी.: – सुप्रीम कोर्ट

अयोध्या प्रकरणी न्यायालयाचा सर्वोच्च निकाल……

काही महत्त्वाचे मुद्दे

अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची सुप्रीम कोर्टाचा निकाल

मुस्लिमांना अयोध्येतच ५ एकर जागा द्यावी कोर्टाचा निर्णय.

रामलल्ला हे पक्षकार सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. वादग्रस्त 2. 77 एकर जागा रामलल्ला चीच सुप्रीम कोर्टाची मान्यता.

श्रीरामाचा जन्म तिथेच झाल्याचं न्यायालयाकडून मान्य. पुरातत्व खात्याने सादर केलेले पुरावे महत्त्वपूर्ण ठरले

निर्मोही आखाड्याची पूजेचा हक्क मिळावा ही याचिका कोर्टाने फेटाळली

ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीचे काम घ्यावं.

सुन्नी वक्फ बोर्ड कडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत.

देशाची एकात्मता सामाजिक स्वास्थ्य सर्व धर्मीय समभाव टिकावा यादृष्टीने निकाल आल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या खटल्यात निकाल वाचन करण्यात आले.

हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे.

चौथरा, सीता की रसोई यांचं अस्तित्व मान्य, रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख.

राम मंदिर बाराव्या शतकातलं- पुरातत्त्व विभाग, वादग्रस्त जमिनीवर हिंदूंकडून पूजा सुरु होती.

बाबरी मशीद रिकाम्या जागी बनली नव्हती, मशिदीखाली मोठी इमारत होती.

निर्मोही आखाड्याचा दावा देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळला, निर्मोही आखाडा सेवक नाही.

रामलल्लाला कायदेशीररित्या पक्षकार मानले.

वादग्रस्त जागा रामलल्लाची, मुस्लिमांना अयोध्येत 5 एकर पर्यायी जागा मिळणार आहे.

1956 पूर्वी हिंदूंकडून वादग्रस्त जागेवर पूजा, 1856-57 ला नमाज पठणाचे पुरावे नाहीत.

ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर उभारण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.

सुन्नी वक्फ बोर्डाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: