इतरराज्यवर्धाविदर्भसंपादकीय

त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

व्यापारी वर्गात मोठा रोष, घटनेचा निषेध करीत दुकाने केली बंद..

Spread the love

उमंग शुक्ला ,(महाराष्ट्र विश्व न्यूज,आर्वी – वर्धा ) – आर्वी नगरपालिकेच्या मुख्याध्यकारिनिदिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता चौकशी न करता सरळ दुकानात जाऊन त्या सात व्यापाऱ्यांना नियमबाह्य पने पोलीस गाडीत बसून पोलीस ठाण्यात आणल्याने लागलीच व्यापारी वर्गात रोशाचे वातावरण निर्माण झाले त्याचे पर्यावसन उस्फूर्तपणे ्यापार्‍यांनी दुकाने बंद करून रोष व्यक्त केला.

पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांनी गर्दी करून या घटनेचा निषेध केला

येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मार्केटमधील दुकानाच्या वर बांधकामाची मंजुरी द्यावी त्यासाठी नगरपालिकेची ठरलेली रक्कम नियमानुसार भरण्यास तयार असल्याचे अर्ज सफदर हुसेन उज्वल मालानी दर्शन मालानी अविनाश जयसिंगपुरे चांद भाई चंदन लोहे घनश्याम वधवा आदींनी अर्ज सादर केला.

मात्र त्यावर दोन महिन्यापासून कोणतीही कार्यवाही नगरपालिकेने केली नाही त्यामुळे या व्यापाऱ्यांनी बांधकाम सुरू केले मात्र नगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी याबाबत दबाव आणून हे बांधकाम अवैध असल्याचे सांगितले असता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी या सातही व्यापाऱ्यांना नोटीस देऊन 12 नोव्हेंबर पर्यंत बांधकाम काढा अन्यथा त्याला आम्ही तोडू अशा आशयाची नोटीस दिली.

मात्र मुदतीपूर्वीच मुख्याधिकारी यांनी पोलीस स्टेशनला या व्यापारा विरोधात एफ आय आर दर्ज केला ठाणेदार यांनी हे प्रकरण चौकशीसाठी ठेवले मात्र त्यांच्यावर काही नगरसेवकांनी दबाब आणला असता त्यांनी सातही व्यापाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

या घटनेने व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे या नियमबाह्य घटनेमुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी अंधारे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता.

याबाबत नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांना विचारणा केली असता मला या कार्यवाही बद्दल काहीच माहित नाही मी संपर्क करून सूचित करतो असे सांगितले.

ही दुकाने 30 ते 35 वर्षे जुनी आहे हे बांधकाम काढण्यासाठी त्यावर नगरपालिकेने बारा पर्यंत मुदत दिली होती येत्या पंधरा तारखेला नगरपालिकेच्या सभेत हा विषय चर्चेसाठी होता पण ,तत्पूर्वीच मुख्याधिकारी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नगरपालिकेची ही सक्ती झाली आहे यावर सी ओ काय कारवाई करणार हे पाहू असे बांधकाम सभापती प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

आर्वीत अनेक व्यापाऱ्यांचे तीन मजली अवैध बांधकाम आहे अनेक वर्षापासून आहेत आम्ही अनेकदा नगरपालिकेला या मोठ्या व्यापाऱ्यांचे बांधकाम पाडण्यासाठी नोटीस दिल्या पण त्यावर कार्यवाही झाली नाही.

कारण, त्यांनी नगरपालिकेला चिरीमिरी देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भ्रष्टाचार केला या दुकानदाराने मात्र त्यांना पैसे दिले नाही .त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात आली यासंदर्भात मुख्याधिकारीआणि नगरपालिकेचे अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत.

बाळा जगताप प्रहार सोशल फोरम

नगरपालिकेने व्यापाऱ्यांना मुदत दिल्यावर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात तक्रार करण्याची काहीच गरज नव्हती मुख्याधिकारी अंधारे यांनी हिटलरशाही दाखवून अति तत्परता दाखवली आणि पोलीसांनी बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांना चोरट्या सारखे गाडीत बसून नेले ही बाब व्यवस्थित नाही या घटनेचा आम्ही निषेध करतो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: