इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीयसाहित्य

५५० व्या गुरुनानक जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचे मुस्लीम बांधवांकडून स्वागत

‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटनेचा सहभाग

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त शीख बांधवानी आयोजित केलेल्या मिरवणुकीचे क्वार्टर गेट येथे मुस्लीम बांधवांकडून स्वागत करण्यात आले . ‘अवामी महाज ‘ सामाजिक संघटनेने त्यासाठी पुढाकार घेतला.’

अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्यासह अनेक मुस्लीम बांधवानी या मिरवणुकीत सहभागी होवून सलोखा आणि परस्पर प्रेमाचे दर्शन घडवले.’अवामी महाज‘चे सचिव वाहिद बियाबानी,मौलाना महमद हुसेन कासमी,अब्दुल वहाब शेख,मश्कुर शेख,शफाकत शेख ,हाजी इम्तियाझ ,मुमताज सय्यद इत्यादी सहभागी झाले .

मिरवणुकीत सहभागी पुण्यातील गुरुद्वाराच्या विश्वस्तांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .शीख बांधवाना फुले आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: