इतरकृषीबुलढाणामदतीचा हातराज्यविदर्भसंपादकीयसामाजिक संस्था

नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा-शिवसंग्राम

शिवसंग्राम ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Spread the love

गजानन कायंदे,(देऊळगाव राजा-बुलढाणा) – सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीपाची पिके पूर्णतः नष्ट झाली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.याचा परिणाम शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे.

परिणामी विध्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे देखील अवघड झाले असून विध्यार्थांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद आहे की,तालुक्यात सतत पडत असलेल्या पाऊसामुळे शेतपिके नष्ट झाले आहेत.शेतकऱ्यांचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे.शेतीचे झालेले नुकसान व शासनाकडून अद्यापही न मिळालेली मदत यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

परिणामी शेतकरी पुत्र विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क भरणे अवघड झाले आहे.याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर होणार असल्याने शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,अल्प.सं.अध्यक्ष अजमत खान,शहर अध्यक्ष विनायक अनपट विनोद खार्डे, संतोष हिवाळे,समाधान पाबळे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: