इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावे द्यावेत – मुनगंटीवार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेसने जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच असा आरोप करणाऱ्यांनी ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत असे असेही ते म्हणाले.

भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. आमच्यावर होत असलेला आमदार खरेदी-विक्रीचा आरोप खोटा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या ४८ तासांत पुरावे द्यावेत.

आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले, जे शिवसेनेचे आमदार १५ वर्षे सत्ता नसतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ठाम राहिले, ते आत्ता कसे फुटतील.

शिवसेनेने आपले आमदार फुटतील या भीतीने नव्हे तर दुसऱ्याच कुठल्यातरी कारणासाठी त्यांना हॉटेलवर नेऊन ठेवले आहे. भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. भाजापा विचाराच्या लाढाईवर काम करीत आली असून यापुढेही राहिल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: