इतरक्रीडादेशराज्य

‘रोहित करू शकतो ते विराट करू शकणार नाही’

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (ब्युरो रिपोर्ट) – बांगलादेशविरुद्ध राजकोटमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने आठ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात रोहित अत्यंत निर्भयपणे खेळत होता आणि त्यामुळेच त्याने फक्त ४३ चेंडूत ८५ धावांची खेळी करुन विजय सुकर केला. टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने रोहितच्या या खेळीचं कौतुक केलं. रोहित जे करु शकतो, ते विराट कोहलीही करु शकत नाही, असं सेहवागने म्हटलं आहे. क्रिकबज.कॉम या वेबसाइटवर होस्ट गौरव कपूरसोबत माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा आणि सामन्याचं विश्लेषण करत होते.

यावेळी सेहवाग आणि जाडेजा यांनी रोहितच्या खेळीचं कौतुक केलं. रोहित सध्या भारतीय संघात ते काम करतोय, जे एकेकाळी सचिन तेंडुलकर करायचे. त्याचं निर्भयपणे खेळणं संघाच्या अत्यंत फायद्याचं आहे, असं मत सेहवागने व्यक्त केलं. “रोहित जे काम करु शकतो, ते कदाचित विराट कोहलीही करु शकणार नाही. रोहित कधीही एकाच षटकात तीन ते चार षटकार लगावण्याचं सामर्थ्य ठेवतो, किंवा ४५ चेंडूत ९० ते १०० धावा करतानाही तो सहजपणे दिसून येतो. तर दुसरीकडे मी कोहलीला असं करताना कधीही पाहिलं नाही,” असं सेहवाग म्हणाला. “शिखर धवन मानसिक दबावात ” भारतीय संघातील कमकुवत बाजूंवरही जाडेजा आणि सेहवाग यांनी विश्लेषण केलं. भारतीय संघ अजूनही आणि यांच्यावरच जास्त अवलंबून आहे. तर मधल्या फळीतील फलंदाजांनी अजूनही विश्वास जिंकलेला नाही, जे भारतीय संघासाठी आवश्यक असल्याचं मत या दोन दिग्गजांनी व्यक्त केलं.

दरम्यान, सेहवागने शिखर धवनच्या खराब होत चाललेल्या फॉर्मकडेही लक्ष वेधलं. कसोटी क्रिकेटमधून बाहेर केल्यामुळे शिखर धवन सध्या एका मानसिक दबावात आहे. आपल्याला आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधूनही बाहेर केलं जाऊ नये याची भीती त्याला सतावत असल्यामुळे तो धावा करताना संघर्ष करतो, असं सेहवागने सांगितलं. वाचा : “भारताच्या सलामी जोडीचा स्वभाव आता उलट होताना दिसत आहे. सुरुवातीच्या १० षटकांमध्ये वेगवान धावा काढण्याचं जे काम सुरुवातीला शिखर धवन करायचा, ते आता रोहित करत आहे, तर शिखरला संघर्ष करावा लागत आहे. अगोदर शिखर वेगवान धावा करायचा आणि रोहित टिकून परिस्थितीचा सामना करायचा,” असंही सेहवाग म्हणाला.

रोहित शर्माने राजकोटमध्ये आक्रमक फलंदाजी केली. ४३ चेंडूत त्याने सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८५ धावा उभारल्या. तर फिरकीपटू मोसादिक हुस्सैनच्या तीन चेंडूंवर त्याने सलग तीन षटकारही ठोकले. रोहित शतकाकडे वाटचाल करत असतानाच, अमीनुल इस्लामच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. तीन सामन्यांची टी-२० मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून तिसरा सामना रविवारी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: