इतरकृषीपश्चिम महाराष्ट्रराज्यसोलापूर

पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला

सोलापूर बाजार समिती; नासलेल्या कांद्याची सोलापूर बाजार समितीत दुर्गंधी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (सोलापूर) – पावसाने भिजलेला कांदा घाईघाईने विक्रीसाठी आणला जात आहे; मात्र असा कांदा नासू लागल्याने विक्री होत नाही. अशा १५ ते २० ट्रक कांद्याची विक्रीच बुधवारी झाली नाही. भिजलेल्या कांद्याला अल्पसा दर मिळत असल्याने शेतकºयांना हात हलवत परत जावे लागत आहे.

सध्या चांगल्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत चांगला दर मिळत आहे. जुन्या व यावर्षीच्या गुणवत्तेच्या कांद्याला राज्यात सर्वाधिक दर सोलापूर बाजार समितीत मिळत आहे. असे असल्यानेच शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणण्याची एकच घाई सुरू केली आहे; मात्र कांदा पिकात पाणी व काढणीनंतरही पाऊस पडत असल्याने कांदा खराब होत आहे. यातील बरा वाटणारा कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत; मात्र काढणी केलेला कांदा वाळण्यासाठी टाकला की पाऊस येतो व झाकावा लागतो. हा कांदा पोत्यात भरून वाहनाने सोलापूरला आणल्यानंतर उतरताना आदळ-आपट होते. याशिवाय पोत्यात भरल्यानंतर गुदमरुन कांदा खराब होतो. असा खराब झालेला कांदा बाजार समितीत खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत.

मंगळवारी व बुधवारी अशा १५ ते २० ट्रक कांद्याची विक्री झाली नाही. काही कांद्याची विक्री झाली; मात्र खरेदीदारांनी कांदा उचललाच नसल्याचे सांगण्यात आले. कांदा शेडमध्ये विविध ठिकाणी पडलेला दिसून आला. काही शेतकरी विक्री न झाल्याने कांदा परत घेऊन गेले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: