पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

डिक्की च्या उद्योजकांनी सबका विश्वास उपक्रमाचा लाभ घ्यावा -सुमंगल शर्मा

Spread the love

महाराष्ट्र विशव न्यूज, (पुणे) – वेळेत सेवा कर व वस्तू कर भरू ना शकणाऱ्या उद्योजकांनी सबका विस्वाष 2019 या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वस्तू व सेवा कर विभागाच्या सह आयुक्त सुमंगल शर्मा यांनी केले. तसेच बाकी कोणत्या विभागाचे माहिती नाही परंतु GST मुळे वस्तू व सेवा करा विभागाला अच्छे दिन आले आहेत त्याबरोबरच करदात्यांना ही या नव्या करप्रणालीमुळे अच्छे दिन आले आले आहेत असे शर्मा म्हणाल्या.

लघु उद्योजक ,युवा उद्योजक त्याचप्रमाणे दलित उद्योजक यांना वस्तू व सेवा कर यावर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच सबका विस्वास या वस्तू व सेवा करामध्ये सूट देणाऱ्या योजनेची माहिती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि भारत सरकारच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी.पी.सिंघ आणि हनिष राठी यांनी ही सबका विस्वास योजनेची माहिती दिली.

यावेळी उपस्थित उद्योजकांनी वस्तू व सेवा कराबाबत येणाऱ्या विविध अडचणीबाबत आपल्या समस्या मांडल्या त्याला समाधानकारक उत्तरे देऊन योग्य असे मार्गदर्शन सुमंगल शर्मा आणि त्यांच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. या चर्चा सत्रास पश्चिम महाराष्ट्रातील दलित उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे पुणे विभागाचे अध्यक्ष अनिल ओव्हाले, महाराष्ट्र चे अध्यक्ष संतोष ,महिला विंग प्रमुख सीमा कांबळे ,महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज आदमाने ,सुशांत कदम तसेच वस्तू व सेवा कर विभागाचे प्रमुख अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: