इतरपर्यावरणपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

पूना क्लब मधील वृक्षतोडी विरोधात ‘सेव्ह द एन्व्हरमेंट’चा पुढाकार

१०० झाडांचे त्यावरील पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे ) – पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या पूना क्लबच्या जागेवर असलेल्या सुमारे १०० झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. मात्र एकही झाड न कापता या ठिकाणी बांधकामाची सोय केली पाहिजे असे सेव द एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या वतीने तक्रारीत म्हटले आहे. स्वतःच्या सुखसोयीसाठी असे बेकायदेशीर बदल घडून आणण्यासाठी अशी वृक्षतोड ?

प्रकल्प झाला पाहिजे मात्र न झाड तोडता झाडांचे व त्यावर राहणाऱ्या पक्षांचे काय ? त्यांचं असणं आवश्यक असल्याचे सांगून फाउंडेशनचे अध्यक्ष ललित ओसवाल म्हणाले की हे वाईट आहे की विकास हा नेहमीच पर्यावरणीय आरोग्यावर अवलंबून असतो शहरातील वृक्षतोड, जंगलातील बेसुमार वृक्षतोड त्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे त्यामुळेच बेसुमारपणे पडणारा पाऊस गावापासून शहरापर्यंत पूरस्थिती होऊन यात अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

पर्यावरण आपण वाचवले पाहिजे शहरात व गावाकडे वृक्ष लागवडी बद्दल नागरिकांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे त्यामुळे असणारी झाडे आपण न तोडता ती वाढली पाहिजेत वाढवली पाहिजेत जोपासली पाहिजेत कोणतेही झाड न तोडता विकास साधता आला पाहिजे म्हणूनच आमच्या सेव एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्यावतीने झाडे वाचवण्यासाठी वाढवण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पूना क्लबला त्याच्या आसपास व झाडे तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यास आम्ही अधिकृतपणे निषेध करू इच्छितो. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे सेव्ह द फाउंडेशनचे अध्यक्ष ललित ओसवाल, उपाध्यक्ष लीना जैन, भारत सुराणा, रोहित बोराना, त्रिशला राणे यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: