आरोग्यइतरदेशप्रशासन

आता सर्व रुग्णालयात एका आजारासाठी असणार एकच फी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज – रुग्णालयांना आता वेगवेगळ्या विमा कंपन्यांसह, समान उपचार दर ठेवणे आवश्यक असणार आहे. विमा नियामकच्या मते, (IRDAI) असे नियम बनवण्यात येत आहेत की, सर्व रुग्णालयात काही निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार आहेत. वेगवेगळे दर असल्याने, विमा असूनही रुग्णालये, रुग्णांकडून वेग-वेगळं शुल्क आकारतात.

IRDAIचा हा प्रस्ताव अनेक विमा कंपन्या आणि टीपीएनेही स्वीकारला आहे. परंतु काही खासगी रुग्णालयं यासाठी तयार नाहीत.

एक रुग्णालय-एक फी

एक रुग्णालय-एक फी या नियमांमुळे सामान्य लोकांना फायदा होणार आहे. या नियमांमुळे, रुग्णालयातून जो वायफळ चार्ज आकारला जातो त्यावर रोख लावण्यात येईल. दरवर्षी रुग्णालये आपल्या उपचारांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ करतात. याचा थेट परिणाम रुग्णाच्या खर्चावर होत असतो.

IRDAIच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, रुग्णालयात मोतीबिंदू, हर्निया, मुतखडा, किडनी ट्रान्सप्लांट यांसारख्या आजारांचे एकच दर ठेवण्यात येणार आहेत.

यामुळे विमा कंपन्यांना, रुग्णालयात कोणत्या आजारासाठी किती खर्च येणार, आणि रुग्णांनाही त्यांच्या आजारासाठी किती खर्च येणार याची माहिती मिळेल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: