इतरनागपूररणधुमाळीराज्यविदर्भ

भाजपचे आमदार जास्त; देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील- गडकरी

मी महाराष्ट्रात परतणार नाही

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नागपूर ) – ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली.

यावर गडकरी यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल. भाजप आणि शिवसेनेला जनमताचा कौल मिळाला आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय होईल. त्यासाठी शिवसेना सहकार्य करेल, असे गडकरी यांनी सांगितले.

तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीच सरकार स्थापन झाले पाहिजे. भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या आहेत. ज्यांनी जास्त जागा जिंकल्या त्याचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: