इतरमुंबईमुंबईरणधुमाळीराज्य

सेनेचे ६४ आमदार रंगशारदात; मुंबई न सोडण्याचे दिले आदेश

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भाजपच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली*. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे.

 उद्धव ठाकरे यांची भूमिका :

‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’

शिवसेना प्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असू अशी ग्वाही या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीत दिली. आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचे आहे.

शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत.

काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने *सत्तास्थापनेचा पेच भाजप आणि शिवसेना यांना सोडवावाच लागणार* आहे. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: