इतरकृषीमदतीचा हातमुंबईमुंबईराज्यसंपादकीयसामाजिक संस्था

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना आकस्मित निधीद्वारे मदत देणार : मुनगंटीवार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीद्वारे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मुंबईत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होतो.

मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीचा शेतकरी हा केंद्रबिंदू होता.

या बैठकीत अवकाळी पावसामळे जे नुकसान झालंय त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसानीचा अंदाज घेण्याचे आदेश दिले.

राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांतील ७० लाख हेक्टरवर अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी १९ लाख हेक्टवर कापूस, १८ लक्ष हेक्टरवर सोयाबीन व इतर नुकसानीचा अंदाज समोर आहे. आत्तापर्यंत ६० लाख हेक्टरचे पंचनामे झाले आहेत.

त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा झाली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीने मदत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकरी-शेतमजुरांना २ ते ३ रुपये दराने धान्य

कोकणापासून पूर्व विदर्भापर्यंत शेतकरी व शेतमजुरांना २ ते ३ रुपये किलो दराने धान्य पुरवठा करण्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जी उभी पीकं जमीनदोस्त झाली अशा शेतीच्या सफाईसाठी मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांकडून बँकांनी सक्तीची कर्जवसूली करु नये असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चारा निर्मितीच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने रब्बीचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावरही लक्ष ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

अहमद पटेल, अमित शाह भेट गुजरातच्या रस्त्यांसाठी

या बैठकीत राज्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. दरम्यान, राज्यात सत्तेचा रस्ता कसा असेल यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली नव्हती, तर गुजरातच्या रस्त्यांसंदर्भात ही भेट होती, असे मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: