इतरबुलढाणाराज्यविदर्भसंपादकीय

आज देऊळगाव राजा तहसील कार्यालयावर स्वाभिमानीं शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी आक्रोश आंदोलन करण्यात आले

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(देऊळगावराजा बुलढाणा ) – सतत ४ वर्षांपासून देऊळगाव राजा तालुका दुष्काळाच्या छायेत असून शेतकरी पाऊस पीक गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती व या वर्षी अति पावसामुळे परतीच्या पावसामुळे १००% टक्के पिकाचे नुकसान झाले आहे.

अगोदर कर्ज बाजारी असलेल्या शेतकरी आत्महतेच्या उबरट्यावर उभा असून त्यांना आधार देणे गरजेचे आहे त्या करता शेतकऱ्यांना ७/१२ कोरा करून विना अट पीक विमा देण्यात यावा तसेच, हेक्टरी ५०हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी या मागणी करीता दि.३०/१०/२०१९ रोजी आपल्या कार्यल्याकडे निवेदन दिले असून तात्काळ देऊळगाव राजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा या करिता आज स्वाभीमनी शेतकरी संघटना तथा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे .

दि.११/११/२०१९ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष शिंगणे, पुंडलिक शिंगणे, बबन चेके, विष्णू देशमुख, भगवान मुंढे, समाधान देवखाने, वसंतराव दहातोंडे, अरुण परिहार, गजु रायते,विनोद नागरे, सचिन साळवे,संतोष डोईफोडे, देवानंद मुढे,संदीप बोगांणे, गणेश पंजरकर,देवा शिंगणे, कैलास शिंगणे,शिवा शिंगणे, आंनथा शिंगणे, उद्धव घुगे, विकास केवट, वैभव भुतेकर, विठोबा घुगे, आत्माराम जाधव , संतोष नागरे, अनिल गीते, संतोष जयभाये, शेर खान ,अनिल शेळके, विजय चेके, सचिन फुकट यांच्यासह शेतकरी बांधव हजर होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: