उत्तर महाराष्ट्रनाशिक

रोटरी महिला मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

Spread the love

मनमाड, प्रतिनिधी – इनरव्हील क्लब मनमाड अर्थात रोटरी महिला मंडळ यांच्यावतीने मनमाड येथे आलेल्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यात आली .संसार उपयोगी साहित्य व किराणा सामान याची मदत या क्लबच्या सदस्यांनी प्रत्यक्ष नुकसान ग्रस्तांच्या घरी जाऊन केली.
मनमाड येथे रात्रीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसाने नदीकाठी राहणार्‍या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. रातोरात अंगावरील कपड्यानिशी नागरिकांना बाहेर पडावे लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य नष्ट झाले, घरात असणारा किराणा, धान्य भिजल्याने उद्या पासून पुढे काय ? असे प्रश्नचिन्ह या नागरिकांवर निर्माण झाले ,अशा परिस्थितीत मनमाड मधील रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेची महिलांची सेवाभावी संस्था इनरव्हिल या संस्थेच्या अध्यक्षा सुमित्रा ललवाणी , प्रांजल लालवाणी,सपना मुथा, स्नेहल बरडिया,लिना सन्कलेचा व इतर सदस्यांनी गहू, इतर किराणा साहित्य, साबण ,मेणबत्ती आदी साहित्यांचे पूरग्रस्तांच्या घरात जाऊन वाटप केले व त्यांना अल्पप्रमाणात का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
या मदतिमूळे समस्त मनमाडकर नागरिक आपल्या पाठीशी उभे असल्याची जाणीव या आपदग्रस्तांना मध्ये निर्माण झाली व हीच जाणीव संकटांवर मात करण्याची उर्मी या आपदग्रस्तांना देईल .इनरव्हील या संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: