परभणीमराठवाडा

स्वच्छता अ‍ॅपवर नागरिकांची तक्रारी नोंदवाव्यातं

Spread the love

परभणी, प्रतिनिधी – आपल्या प्रभागात स्वच्छता होत नसल्यास, घंटागाडी येत नसल्यास स्वच्छता अ‍ॅपवर नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.
या संदर्भात मंगळवारी(दि.चार) बैठकीचे महापालिकेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी 16 अधिकारी, सहाय्यक नगररचनाकार, शहर अभियंता, जीवशास्त्र विभागप्रमुख, आरोग्य विभाग, स्वच्छता निरीक्षक, इंजिनिअर, प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग या सर्व अधिका-यांची बैठक घेवून शहरामध्ये स्वच्छता अभियान 2020 अंतर्गत शहरात खड्डे बुजविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह नादुरूस्त असल्यास दुरूस्त करून घेणे, घंटागाडीत कचराचे विलगीकरण, घरी कंपोस्ट खत निर्मिती करण्या संदर्भात नागरिकांना आवाहन करण्याचे सांगण्यात आले. स्वच्छता अभियान 2020 सर्व्हेक्षण अंतर्गत अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत नागरिकांना थेट फोन कॉल करण्यात येणार असून त्यांना स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 अनुषंगाने काही प्रश्‍नाची विचारणा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या झोन अंतर्गत स्वच्छता ठेवावी, अशा सूचना आयुक्त श्री पवार यांनी केल्या.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: