आरोग्यपरभणीमराठवाडा

परभणी मनपाःनागरिकांनी कोरडा दिन पाळण्याचे आवाहन

Spread the love

परभणी, प्रतिनिधी – परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात आरोग्य विभागामार्फत मलेरिया विभाग यांच्या मार्फत शहरात आरोग्य विभाग कर्मचारी व मलेरिया विभागाचे कर्मचारी फिरत आहेत. शहरामध्ये फिरत असताना नागरिकांच्या घरी जावून कोरडा दिन पाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
परभणी शहरात तापीने आजारी पडणा-या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छते संदर्भात विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जावून पाण्याची तपासणी केली जात आहे. यावेळी आठवड्यातून एकदा कोरडादिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी(दि.पाच) रोजी शहरातील मोमीनपुरा,गांधीपार्क उद्यानातील हौदात, नटराज रंगमंदिराच्या टॅकमध्ये गप्पी मासे टाकण्यात आले. तसेच प्रत्येक नागरिकांच्या घरी जावून रात्रीच्या वेळी धुर फवारणी करण्यात येत आहे. सोमवारी रात्री बॅटमिंटन हॉल येथे धूर फवारणी करण्यात आली. तसेच शहरातील विविध कॉलनी, नगर, गल्लीत लहान 18 फॅगिंग मशिनद्वारे धुर फवारणी करण्यात येत आहे. या संदर्भात मंगळवारी आयुक्त रमेश पवार यांनी आरोग्य अधिकारी डॉ.आरती देऊळकर, जीवशास्त्र विभागाचे प्रमुख विनय मोहरीर यांच्यासोबत बैठक घेतली. शहरातील डॉक्टर्स, लॅबअस्टिटंट यांच्या बैठकीचे बुधवारी(दि.सहा) बी.रघूनाथ सभागृह आयोजन दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर्स शहरातील उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: