इतरकोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रराज्यसाहित्य

किल्ले स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

सोहळ्याला शासकीय अधिकारी, कलावंत आणि राजकीय मंडळींची हजेरी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(हणबरवाडी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची आजच्या पिढीला माहिती होण्यासाठी गड-किल्ल्यांचा इतिहास आपली संस्कृती या सर्वांविषयी आदर निर्माण व्हावा हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हणबरवाडी, मसूर या ठिकाणी दिग्दर्शक रामकुमार शेडगे व सिध्दनाथ शेडगे यांनी भव्य किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

याचा बक्षिस वितरण समारंभ सोहळा नुकताच पार पडला यात सहभागी झालेल्या प्रथम सात विजेत्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, स्पर्धेचे आयोजक दिग्दर्शक रामकुमार शेडगे, सातारा पोलीस मध्ये कार्यरत असलेले पै. सिद्धनाथ शेडगे, चेरमन गजानन शेडगे तसेच कवठे मंडल अधिकारी प्रशांत कोळेकर, तलाठी हणबरवाडी, सोमनाथ तांबेवाघ, लता शेडगे यांच्या हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी कराडचे तहसिलदार वाकडे म्हणाले की शेडगे बंधूनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून लहानपणापासूनच मुलांच्या मनावर असे मोलाचे तसेच आपल्या इतिहासाचे संस्कार होणे आवश्यक आहे.

हणबरवाडी हे ऐतिहासिक गाव असून या गावाला दीडशे वर्षाहून ही जास्त दिंडी व वारकऱ्यांची परंपरा लाभलेली आहे. अशा ऐतिहासिक गावात मला बोलावून माझ्या हस्ते सत्कार करण्यात आले. त्याबद्दल मी शेडगे बंधूंचा ऋणी आहे.

जगदाळे म्हणाले की हणबरवाडी गावात घेतलेली किल्ले स्पर्धा तरूणांना प्रेररीत करणारी आहे. तर चव्हाण म्हणाले की या गावाला संतांची व वारकऱ्यांची परंपरा लाभली असून असे उपक्रम देशहितासाठी व समाजासाठी गरजेचे आहेत. शेडगे बंधूंनी असे उपक्रम राबवल्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

दिग्दर्शक रामकुमार शेडगे म्हणाले की आपला इतिहास आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. वाढवली पाहिजे आमचा हा खारीचा वाटा असून समाजातून असे हजारो हात पुढे येणे गरजेचे आहेत. सिद्धनाथ शेडगे यांनी आभार मानले तर नितीन पवार व व्यंकट शेडगे यांनी सूत्रसंचालन केले.

विजेते देवराज शेडगे, आदित्य शेडगे, वेदांत ढेरे, साहिल शेडगे, सर्वेश शेडगे, यशराज दबडे, स्वराज पवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मच्छिंंद्र माने, अधिक दबडे, बाबाजी साळुंखे, नितीन पवार, संतोष देसाई, व्यंकट शेडगे, सत्यवान शेडगे, अरुण शेडगे, हणमंत शेडगे, विलास कदम, नानासो पवार, सुनील जाधव, बाळासो पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: