इतरराज्यवर्धाविदर्भसंपादकीय

प्रहार सोशल फोरमचे बँकेत आंदोलन

सक्तीची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(वर्धा) – वर्ध्यातील आर्वी येथे स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेकडून सुरु केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीला मुद्दत वाढ देण्यात आली. यावेळी स्टेट बँकेकडून आडमुठ्या पद्धतीने शेतकऱ्यानवर सक्तीच्या वसुली मोहीम रावबवली जात होती.

याच्या विरोधात प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी शेतजाऱ्यांसोबत जाऊन शेतकऱ्यांच्या परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी अवकाळी पावसाने पीक हाताचे गेले असतांना शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे कुठून असा सवाल केला. यावर स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अनिल साटोने मुद्गत वाढ देऊ केल्याने शेतकऱ्यांचा संताप शांत झाला.

वर्ध्यातील आर्वीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकऱ्यांवर थकीत असलेले कृषी कर्ज सक्तीची केली. यावेळी यंदा पीक पाणी न झाल्याने कृषी कर्ज थकले आहे. हफ्ते थकताच इतर कर्ज ज्यामध्ये गृहकर्ज, सोने तारण, ट्रॅक्टर इतर लोन हे नियमित भरत असतांना सुद्धा त्यांना कृषी कर्जाचे थकबाकीदारा दाखवत सक्तीची वसुली मोहिमेच्या नोटीस दिल्या आहे.

यात घर, आदीसह कर्जधारकाची इतर मालमत्ता विकून कृषी कर्ज वसुलीची नोटीस पाठवत एक प्रकारे दंडेली सुरू केली आहे. यात दिवसातून फोन यासह तीन नोटीस बजावण्यात आल्या आहे. यामुळे काहीनी धसका घेतल्याने आत्महत्यला प्रवृत्त करण्याचे काम सुरू आहे.

याचा विरोधात आज प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी काही पदाधिकारीकाऱ्यांसह शेतकऱ्यांना बँकेच्या कृषी शाखेत पोहचले. यावेळी त्यांनी विषारी औषध घेऊन बँकेत पोहचल्याने चांगलीच खळबळ उडाली.

यावेळी चर्चा सुरू असताना मात्र वातावरण तापले असताना नागपूर क्षेत्र साह्यक प्रबंधक अनिल साटोने यांनी परिस्थिती एकूण घेतली. शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज वसुली थांबवत थोडी मुद्गत वाढ देत असल्याचे बाळा जगताप यांना सांगितले. यामुळे प्रकरण चिघळण्याची ऐवजी थांबले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: