इतरनांदेडमराठवाडाराज्यसंपादकीय

काळजी करु नका विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे :-उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नांदेड) – ‘काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय हे माहीत आहे’, असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

शेतकऱ्यांनी रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील जाणापुरी इथून उद्धव ठाकरेंच्या नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरेही होते हेक्टरी 25 हजाराच्या मदतीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी पीकविमा आणि नुकसानभरपाई केंद्र उभारण्याचे आदेश उद्धव यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी असून, प्रति हेक्टर 25 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेचं तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मदत केंद्र उभारणार आहे. तसे आदेशही शिवसैनिकांना देण्यात आले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 17 जुलैला शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात धडक मोर्चा काढला होता. वांद्र्यातील बीकेसी मैदानावर हा मोर्चा धडकला होता. यावेळी त्यांनी ज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: