इतरगुन्हेविश्वमुंबईमुंबईराज्य

Whatsapp हॅक करुन या अभिनेत्रीच्या अकाऊंटवरुन केले अश्लील व्हिडीओ कॉल्स

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई ) – व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे प्रकरण ताजे असताना टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. अश्लील व्हिडीओ कॉल करण्यासाठी आरोपी आपल्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे तेजस्वी प्रकाशने म्हटले आहे.

ज्या व्यक्तीने माझे व्हॉट्सअॅप हॅक केले होते तो माझ्या फोनमधील कॉनटॅक्टस बरोबर मैत्रीपूर्ण चॅटिंग करायचा. त्यांना लिंक पाठवायचा. लिंक मिळाल्यानंतर तो कोड पाठवायला सांगायचा.

समोरच्याने व्हॉट्सअॅपवर कोड पाठवल्यानंतर तो व्हिडीओ कॉल करायला सुरुवात करतो. तुम्ही एकदा त्याच्या फोनला उत्तर दिले की, त्यानंतर तुम्हाला त्याचे अत्यंत वाईट अनुभव येतात असे तेजस्वीने सांगितले.

काल मीरा रोड येथे मी एका विशेष भागाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. माझ्या अवतीभवती अनेक लोक असताना अचानक माझ्या फोनवर व्हिडीओ कॉल आला. मी तो फोन कॉल उचलताच मला समोर न्यूड माणूस दिसला. समोरचे दृश्य बघून मला धक्काच बसला.

माझ्यासाठी तो खूप वाईट अनुभव होता असे तेजस्वी प्रकाशने सांगितले. इंडस्ट्रीमधल्या आणि माझ्या अन्य मित्र-मैत्रिणींना गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे व्हिडिओ कॉल येत असल्याचे त्यांनी मला सांगितले होते.

अनेक अभिनेत्रींनी मला त्यांना असे फोन कॉल्स येत असल्याचे सांगितले होते. त्यांच्यासाठी सुद्धा हा धक्का होता. मित्र-मैत्रिणी फोन करुन त्यांची चिंता व्यक्त करायचे पण जे फक्त कामाशी संबंधित आहेत. मला जवळून ओळखत नाहीत? त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असेल? असे तेजस्वी म्हणाली.

मी सायबर क्राइम सेलला फोन केला. गोरेगावमधील माझ्या घराजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मला तक्रार नोंदवायला सांगितली. पहाटे तीन पर्यंत शूटिंग सुरु असल्यामुळे मी जाऊ शकले नाही.

मी लवकरच पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचे तेजस्वीने सांगितले. फक्त तेजस्वीच नाही तर करण संगिनीमधील सहकलाकार आशिम गुलाटीचाही व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: