इतरगुन्हेविश्वनांदेडमराठवाडाराज्य

पोलीस चकमकीत ‘ शेरा ’ ठार; नांदेड जिल्ह्यात थरार

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नांदेड) – शहर व जिल्ह्यात मोठी दहशत असलेला गुंड शेरा हा पोलसांच्या चकमकीत ठार झाला. ही घटना आज सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भोकरफाटा परिसरात घडली.

यावेळी गुंड शेराने पोलिसांवर तीन फैरी झाडल्या. मात्र यात सुदैवाने पोलिस वाचले. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी मारलेल्या गोळीत तो ठार झाला. पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळाला भेट दिली.

शहरात व जिल्ह्यात कुख्यात रिंदा याचे आम्ही हस्तक आहोत असे सांगुन पिस्तुलचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा शेरुसिंग उर्फ शेरा दलबिरसिंग खैरा (वय ३०) याने रविवारी दि.३ रोजी रात्री शहराच्या श्रीनगर व नमस्कार चौक परिसरात दोन दुकानात लुट केली होती.

यावेळी त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली. मात्र शेरा हा फरार झाला होता. त्याच्या मागावर रात्रीपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लक्ष ठेवून होते. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांचे पथक गुप्त माहितीवरुन भोकर फाटा ते बारसगाव दरम्यान असलेल्या हुनासायान देवस्थान परिसरात तो एका आखाड्यावर लपून बसल्याचे समजले.

यावरून श्री. भारती यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन अधिकची कुमक मागवून घेतली. त्यानंतर या आखाड्याला पोलिसांचा गराडा पडला. यातून आपली सुटका होणार नसल्याचे शेरा याला समजताच त्याने नशा करून पोलिसांच्या दिशेने आपल्या जवळील पिस्तुलातून तीन फैरी झाडल्या.

मात्र सावध असलेल्या पोलिसांनी त्या तीन्ही गोळ्या चुकविल्या. यावेळी दगड मारून शेराच्या हातातील पिस्तुल खाली पाडला. यानंतर एका अधिकाऱ्याने त्याच्या दिशेने शासकीय पिस्तुलातून गोळी झाडली. झाडलेली गोळी थेट शेराच्या डाव्या खांद्याच्या खाली ऱ्हदयाला छेदली. यात तो जागीच ठार झाला.

हे वृत्त शहरभर वाऱ्यासारखे पसरले. पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शेरा याचा मृतदेह विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केला असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला आहे. रात्री उशिरापर्यंत शेराचा कोणीच नातेवाईक रुग्णालयाकडे फिरकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात व जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कुख्यात गंड रिंदाच्या नावाचा वापर करून व्यपाऱ्यांना खंडणी मागणारा शेरुसिंग उर्फ शेरा आज पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. त्याने पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्या.

मात्र पोलिसांनी त्या चुकविल्या. माझे ध्येय रिंदा याला पकडण्याचे असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाचे त्यांनी कौतूक केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: