इतरपर्यावरणपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात तर वाहतूकही कोलमडली

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – गेले काही दिवस जवळपास रोज येत असणाऱ्या पावसाने सोमवारीही पुण्याला झोडपून काढले. मात्र पुणे शहर प्रशासनाने यातून काहीही धडा न घेतल्याने आजही बहुतांश रस्त्यांवर पाणी आणि त्यातून कसेबसे वाट काढणारे, जीव मुठीत धरून जाणारे पुणेकर बघायला मिळत आहेत. साेसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण दिवाळी पावसात गेल्यानंतर आता हिवाळ्यातही पाऊस पुणेकरांची पाठ साेडायला तयार नाही.

संध्याकाळी 6 च्या सुमारास शहरातील पूर्व भागातील उपनगरांमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली. विमाननगर, वडगावशेरी, वाघाेली, धानाेरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्याचबराेबर बिबवेवाडी, काेंढवा परिसरातदेखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पश्चिम उपनगरांमध्ये देखील जाेरदार पाऊस काेसळत आहे. वारजे- माळवाडी, कर्वेनगर, काेथरुड या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस काेसळत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: