इतरप्रशासनबुलढाणाराज्यविदर्भ

अतिवृष्टीमुळे साथीच्या आजारांच्या प्रमाणात वाढ

तात्काळ उपाययोजना करा - शिवसंग्रामची न.प.प्रशासनाकडे मागणी

Spread the love

गजानन कायंदे, (देऊळगावराजा-बुलढाणा) – गेल्या काही दिवसात परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातल्याने नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात व इतर आरोग्य केंद्रात तसेच खाजगी रुग्णालयात डेंग्यू,मलेरिया सारख्या साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साथीच्या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी नगर पालिका व आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

मागील दोन आठवड्या पासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतीचे प्रचंड नुसान केले आहे. त्याबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम झाला आहे. देऊळगांव राजा तालुक्यात व शहरात डेंगू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसेदिवस या रोगांच्या रुग्णाची संख्या वाढतच आहे. लहान मुलांपासून वृद्धां पर्यंत सर्वच नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. मात्र नगरपालिका व आरोग्य विभाग सुस्त झाले आहे.

ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, नगर पालिका आरोग्य विभागाकडून तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात. तसेच रुग्णांची गैरसोय होणार नाही याची सक्तीने काळजी घ्यावी. देऊळगांव राजा शहरात नगरपरिषदेने व ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाने डास रोधक व जंतूनाशकांच्या फवारण्या युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे. तसेच जीवघेण्या साथीचे आजार थांबवण्याच्या दृष्टीने नगरपालिका व आरोग्य विभागा मार्फत आवश्यक त्या उपाय-योजना करण्यात याव्यात अशी मागणी आज शिवसंग्रामकडून नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,शहर अध्यक्ष विनायक अनपट, अजमत खान,समाधान पाबळे आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: