इतरकोकणराज्यसाहित्यसिंधुदुर्ग

‘अक्षरस्पंदन’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(देवगड-सिंधुदुर्ग) – अरुण गुमास्ते लिखित “अक्षरस्पंदन” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे देखण्या सजावटीत उत्तरोत्तर चढत गेलेल्या कार्यक्रमात जाणकार, चोखंदळ श्रोत्यांच्या उपस्थितीत सिने-नाट्य-मालिका-एकांकिका कलावंत नारायणराव जाधव यांच्या हस्ते संवेदना प्रकाशनचे सर्वेसर्वा नितीन हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले.

शुभेच्छा देण्यासाठी मंचावर कणकवली येथील ज्येष्ठ डॉ म्हसकर, म्हसकर, डॉक्टर आणि रंगधर्मी, राजेंद्रजी चव्हाण, उत्कृष्ट वक्ते माजी मुख्याध्यापक अरूण सोमण, चोखंदळ आणि व्यापक वाचन व्यासंग जपणारे सुप्रसिद्ध निवेदक, प्रमोद नलावडे उपस्थित होते.

सुरवातीपासून शेवट पर्यंत कार्यक्रम नियोजनपुर्वक प्रवाही ठेवण्याचं काम त्यांची मुलगी आणि कलावंत जावई यानी समर्थपणे हाताळलं. मंचावरील उपस्थीत वरील सर्व वक्त्यानी प्रभावीपणे विचार मांडून व्यासपीठाचा विचारमंच केला.

डॉक्टर गुमास्तेच्या पत्नीचा सर्वाना आग्रहानं जेवायला लावण्याचा दृढ संकल्प होता तो श्री. व सौ.महेश कानेटकर यांच्या पाकनैपुण्याने,आग्रहाने साग्रसंगीत तृप्त झाला.निसटलेला श्वाससुद्धा श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचं ध्वनिव्यवस्थेचं संवेदनशील काम सुधीर घाडीच्या सहकाऱ्यानी निर्दोषपणे पार पाडले.

ग्रीनव्हिलाचे बांदकर आणि प्रकाश खवणेकरानीही मनापासून सहकार्य केलं. डॉक्टरांचे सहकारी डॉ.रामदासजी बोरकर, महेशजी खोतही कार्यक्रम यशस्वी करण्यात सहभागी होते.

डॉक्टरांच्या चित्रकार मुलीनं काढलेलं स्वतःच्या भावनांचं अक्षरचित्रही भावुक होतं.शेवटी चार चांद लावताना डॉक्टरांच्या आईने म्हटलेलं आशीर्वादपद हे विसरता येणार नाही.

सगळा भार स्वतःच्या खांद्यावर घेऊन प्रकाशन सोहळा यशस्वी करणाऱ्या ॲडव्होकेट श्री.अमेय गुमास्तेनी कृतज्ञता व्यक्त केली.वडिलांच्या पाठिशी उभ्या रहाणाऱ्या आईचा उल्लेख करताना त्यांचा दाटलेला गळा ही पण एक भावपूर्ण कविताच होती.

आणखीही अनेक विषयांवरची ग्रंथसंपदा डॉ.गुमास्तेंच्या प्रतिभेनं रसिकाना द्यावी या शुभेच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: