इतरकोकणराज्यसंपादकीयसिंधुदुर्ग

शेतकर्यांप्रमाणे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळवून देणार ; आशिष शेलार…

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(सिंधुदुर्ग) – जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात क्यार चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांसह पर्यटन व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे या नुकसानीची भयानकता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत शेतकर्‍यांप्रमाणेच मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणार आहे असे आश्‍वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी येथे दिले.

समुद्री उधाणाच्या तडाख्यात देवबाग किनार्‍यावरील बंधारे उद्ध्वस्त झाले असून वस्तीला धोका निर्माण झाला आहे. यापार्श्‍वभूमीवर चिवला बीच येथे ज्याप्रमाणे टेट्रापॉड बंधारा बांधण्यात आला.

त्याच धर्तीवर देवबागच्या सुरक्षिततेसाठी लवकरच टेट्रापॉडचा बंधारा बांधण्यात येईल. यासाठीचा एकत्रित तत्काळ उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करू असे आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी यावेळी स्पष्ट केले.

मालवण दौर्‍यावर आलेल्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज तारकर्ली, देवबाग येथे भेट देत चक्रीवादळ, सागरी उधाणामुळे मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, जयदेव कदम, राजू राऊळ, दत्ता सामंत, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, विलास हडकर, आप्पा लुडबे, बबन परुळेकर, राजा गावडे, देवानंद चिंदरकर, डॉ. भरत मणचेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. शेलार म्हणाले, क्यार चक्रीवादळात जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. याबाबतचा आज आढावा घेतला जाणार आहे. नुकसानीची भयानकता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.

मच्छीमारांबरोबर पर्यटन व्यावसायिकांचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांप्रमाणे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांनाही नुकसान भरपाई मिळावी यासाठी पॅकेजमध्ये यांचा समावेश केला जाईल. लवकरात लवकर ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सागरी उधाणामुळे समुद्री लाटांचे पाणी वस्तीत घुसल्याने किनार्‍यालगतच्या ग्रामस्थांना जीव मुठीत धरून वास्तव्य करावे लागले. ख्रिश्‍चनवाडीपासून मोबारपर्यतच्या बंधारा उद्ध्वस्त झाल्याने या बंधार्‍याचे काम तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

यावर आमदार राणे व श्री. जठार यांनी याठिकाणी टेट्रापॉडसारखा बंधारा उभारून येथील समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल. यासाठीचा एकत्रित निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करू असे स्पष्ट केले.

तर चक्रीवादळ व मुसळधार पावसात जलक्रीडा व्यावसायिक व पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले. या नुकसानीसह अन्य समस्यांचे निवेदन यावेळी व्यावसायिकांनी श्री. शेलार यांना सादर केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: