इतरनागपूररणधुमाळीराज्यविदर्भसंपादकीय

‘रोज अग्रलेख लिहा, 9 वाजता पत्रकार परिषद घ्या, ‘विक्रम-वेताळ’नंतर आता ‘उद्धव-बेताल’ची कथा’

रा. स्व. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ मधून संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नागपूर ) – शिवसेना खासदार संजय राऊत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकेची झोड उठवत असतानाच आता रा. स्व. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ मधून संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय…’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘रोज अग्रलेख लिहिणं आणि नंतर 9 वाजता पत्रकार परिषद घेत फिरणं, बातम्या पेरणं यामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार चालवून दाखवणं यामध्ये अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?’ असा टोला ‘तरुण भारत’ मधून लगावण्यात आला आहे.

‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या…. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय… आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही… तशी ती आजही करण्याची गरज नाही…. महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालवली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्याच्या मागे लागला आहे. ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: